महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कोल्हापूर डिव्हीजनचे नवनियुक्त अधिक्षक अभियंता जी.एम. लटपटे यांची दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली सदिच्छा भेट घेतली
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि.१४: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कोल्हापूर डिव्हीजनचे नवनियुक्त अधिक्षक अभियंता जी.एम. लटपटे हे इचलकरंजी येथील कार्यालयात आलेवेळी त्यांची दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली व त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यात स्वागत केले. यावेळी इचलकरंजी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता रमेश कदम व उपकार्यकारी अभियंता सुनिल अकिवाटे हे उपस्थित होते.
दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अधिक्षक अभियंता जी.एम. लटपटे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणेत आले. यानंतर अध्यक्ष पाटील यांनी दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या आजपर्यंतच्या कार्याची माहिती देऊन महावितरण व पॉवरलुम असोसिएशन यांच्यातील यापूर्वीचे संबंध व सहकार्य अशाचप्रकारे आपल्याकडून पुढे चालू राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यंत्रमागधारकांच्या वीज बिलात आलेली पोकळ थकबाकीवरील व्याज व दंड व्याजाची रक्कम कमी करणे, पुर्वीप्रमाणे मागेल त्याला मल्टीपार्टी व एकाच शेडमध्ये अनेक कनेक्शन मिळावे, मागेल त्याला त्वरीत वीज कनेक्शन, वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, पार्वती औद्योगिक वसाहतीमधील प्रश्न, इचलकरंजी व परिक्षेत्रासाठी २६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती, लॅडर व्हेईकल, तीन शिफटमध्ये कर्मचारी असे प्रश्न उपस्थित करून यामध्ये आपण स्वत: लक्ष घालून यावर कायम स्वरूपी तोडगा काढावा म्हणून विनंती केली.
यावेळी अधिक्षक अभियंता लटपटे यांनी उपस्थित संचालक व यंत्रमागधारक यांनी मांडलेल्या विविध समस्यांचा अभ्यास करून वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून त्या प्राधान्याने दूर करून यंत्रमागधारक व महावितरण यांच्यातील संबंध जास्तीत जास्त दृढ करण्याचे प्रयत्न होतील असे आश्वासन दिले व यंत्रमागधारकांनी महावितरणला पूर्वीप्रमाणे सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सदर शिष्टमंडळात दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सोमाण्णा वाळकुंजे, चंद्रकांत भोपळे, पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, दत्तात्रय टेके, किरण पोवार, राजाराम गिरी, एअरजेट लुम ओनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश गौड यांच्यासह प्रतिष्ठीत कारखानदार उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.