पंचायत समिती सदस्या सौ रेश्मा सनदी यांचे कार्य आदर्शवत  

भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक अजित मामा जाधव यांचे प्रतिपादन

कबनूर ता.५- हबीब शेख

हातकणंगले पंचायत समितीच्या सदस्या रेश्मा सनदी यांनी दूरदृष्टीने धोरणात्मक कार्य केल्याने पंचायत समिती मतदारसंघात विकास झाला आहे. रेश्मा सनदी यांचे कार्य आदर्शवत आहे.”असे प्रतिपादन नगरसेवक अजित मामा जाधव यांनी केले.येथील गांधीविकासनगरमध्ये पंचायत समितीच्या फंडातून नळपाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील होते.पंचायत समिती सदस्या रेश्मा सनदी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यावेळी उपसरपंच सुधीर पाटील,माजी उपसरपंच जंबा पाटील, जावेद सुतार,किशोर पाटील,बजरंग कांबळे, गजानन पोळ,डॉ.पाटील आदी उपस्थित होते. पापालाल सनदी यांनी आभार मानले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.