प्रशांत यादव यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या सरचिटणीस पदी निवड

 

संगमेश्वर: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी बैठकीत चिपळूणचे धडाडीचे नेतृत्व प्रशांत यादव यांची राज्य सरचिटणीस पदी निवड करण्यात आली अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने आणि दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटी नंतर रत्नागिरी जिल्ह्यातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांच्याकडे सोपविण्यात आली. माजी आमदार रमेश भाई कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत यादव यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच काँग्रेस आय पक्षाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेतली. त्यानंतर त्यानी संगमेश्वर चिपळूण गुहागर खेड या तालुक्यातील युवा पिढीला सोबत घेऊन पक्षी बांधणीसाठी लोकांचा जनसंपर्क वाढवत सर्वांच्या अडीअडचणीला मदतीचा हात पुढे करत जनसामान्यांमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.