देवरुख न. पं. विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध
देवरुख: मोहम्मदताहा नेवरेकर
देवरुख नगरपंचायतीची विषय समिती निवडणूक नुकतीच पार पडली .या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या गटाने निर्विवाद यश संपादन केले. सदस्यांचे तौलनिक संख्याबळानुसार भाजपा गटाचे पारडे मजबूत असल्याने बांधकाम सभापती पदी श्री संतोष कृष्णा केदारी ,पाणी सभापती पदी सौ रेश्मा तुकाराम किर्वे, आरोग्य सभापती पदी मनसेच्या सौ सानवी संसारे आणि स्थायी समिती थेट सदस्य म्हणून श्री सुशांत मुळ्ये यांची बिनविरोध निवड झाली.
नूतन सर्व पदाधिकारी यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल पक्षाचे आणि वरिष्ठांचे आभार मानले आहेत.सोबत असलेल्या मनसे, रिपाई आणि अपक्ष नगरसेविका सौ वैभवी परशुराम यांचे आभार व्यक्त करण्यात आले.पिठासन अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी मा. श्री सूर्यवंशी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्री प्रसाद शिंगटे यांनी काम बघितले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.