अपर्णा कॉम्प्लेक्स व्यापारी संघटनेतर्फे शिवजयंती निमित्त सत्यनारायण महापूजा आणि नवीन कार्यकारिणीची निवड
कडवई:नियाझ खान
कडवई फाटा व्यापारी संघटनेतर्फे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. ही पूजा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. या धार्मिक सोहळ्यास व्यापारी, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
नवीन कार्यकारिणीची निवड पूर्ण
याच वेळी कडवई फाटा व्यापारी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
- अध्यक्ष: निलेश तुळसणकर
- उपाध्यक्ष: संदीप सावरटकर
- सचिव: विनायक दहिवलकर
- सहसचिव: अभिजीत शिंदे
- खजिनदार: प्रशांत सुर्वे
- उपखजिनदार: मंगेश तुळसणकर
- सल्लागार: प्रकाश कुवळेकर, चंद्रकांत तुरळकर, एकनाथ बेटकर

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती आणि सन्मान
या विशेष प्रसंगी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. शेखर निकम, कडवई ग्रामपंचायत सरपंच विशाखा कुवळेकर, संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे सहसचिव पत्रकार मिलिंद कडवईकर, काँग्रेस (आय) संगमेश्वर तालुका महिला तालुकाध्यक्षा मिताली कडवईकर, पत्रकार मिलिंद चव्हाण, प्रतिष्ठित मंडप डेकोरेटर विजय कुवळेकर, संगमेश्वर पोलीस निरीक्षक अमित यादव, माजी सभापती कृष्णा हरेकर, माजी पोलीस पाटील रमेश तुळसणकर, महालक्ष्मी टाइम्स वृत्तपत्राचे पत्रकार दीपक तुळसणकर, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वसंत उजगावकर, तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य कमलेश ओकटे यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.संघटनेच्या वतीने या सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
भविष्यात संघटनेच्या बळकटीचा निर्धार
कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. व्यापारी व ग्रामस्थांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आणि आगामी काळात संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.