संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे ‘निंबस 2K25’ राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर:संजय  कांबळे 

दि .२० :संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात “निंबस 2K25” या राष्ट्रीय स्तरावरील भव्य तांत्रिक स्पर्धेचे आयोजन २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० ते सायं. ५.०० दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण विचारांना, सर्जनशीलतेला आणि तांत्रिक कौशल्यांना चालना मिळणार आहे.

या स्पर्धेत तांत्रिक व नाविन्यपूर्ण क्षेत्रातील विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत:

कॅड बस्टर्स: संगणक-सहाय्यित डिझाइनमधील कौशल्यांची परीक्षा

सर्किटिक्स: सर्किट डिझाइन आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रातील नवकल्पनांचा सखोल अभ्यास

टेक रोबस्टा: रोबोटिक्समधील अत्याधुनिक संशोधनाचे प्रदर्शन

ब्रेन स्टॉर्मर्स (क्विझ): तांत्रिक समस्यांवर विद्यार्थ्यांची विश्लेषणात्मक क्षमता चाचपडणे

कोड क्रुसेड: प्रोग्रामिंगमधील आव्हानात्मक समस्या सोडविण्याची संधी

पेपर प्रेझेंटेशन: अभियांत्रिकी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण संशोधन आणि कल्पनांचे सादरीकरण

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन आपली कौशल्ये सादर करावीत असे आवाहन केले आहे.

या स्पर्धेसाठी एक लाखाहून अधिक बक्षिसे असून विविध उद्योग आणि उद्योजकांनी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप जाहीर केली आहे. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. प्रतीक एस. आवटी, प्राध्यापिका तृप्ती एस. पुजारी व संपूर्ण टीम कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेत आहेत. या भव्य उपक्रमाचे आयोजन संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजयजी घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. “निंबस 2K25” स्पर्धेमुळे राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य आणि नवकल्पनांचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, ही स्पर्धा तंत्रज्ञानाच्या उत्कर्षाचा नवा अध्याय लिहिणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.