डीकेटीईच्या इटीसी इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश
आयडीई बुटकॅम्प स्पर्धेत तृतीय क्रमांक, 'स्मार्ट कॉलर' प्रकल्पाला गौरव
इचलकरंजी: विजय मकोटे
दि . १२ : मध्यप्रदेशातील ज्ञानगंगा इन्स्टिट्यूट, जबलपूर येथे झालेल्या ‘आयडीई बुटकॅम्प’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (इटीसी) विभागाच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले आहे. या स्पर्धेत पूर्वा कुलकर्णी, सम्राज्ञी माने, अद्वैत कुलकर्णी, तनिष कुलकर्णी आणि अवधूत महाजन या पाच विद्यार्थ्यांनी डॉ. जे. पी. खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्मार्ट कॉलर’ या नाविन्यपूर्ण प्रकल्पावर काम करत हे यश मिळवले. इनोव्हेशन सेल (MIC) आणि AICTE, दिल्ली यांच्या वतीने या बुटकॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित करणे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देणे हा होता.
स्मार्ट कॉलर : गायींच्या आरोग्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले स्मार्ट कॉलर हे एक अत्याधुनिक उपकरण असून, यात विविध सेन्सर्सचा वापर करून गायींच्या हालचाली, तापमान, आहार आणि इतर शारीरिक क्रियांवर सतत नजर ठेवली जाते. या सेन्सर्सकडून गोळा केलेली माहिती मोबाईल अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळते, ज्यामुळे गायींच्या आरोग्यावर योग्य वेळी उपचार करणे शक्य होते. या तंत्रज्ञानामुळे गायींचे आरोग्य सुधारते आणि दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.
स्पर्धेत १०० हून अधिक कॉलेज, ६०० हून अधिक गटांचा सहभाग
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील १०० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ६०० हून अधिक संघांनी भाग घेतला होता. स्पर्धेत तीन फेऱ्या होत्या, ज्यामध्ये बौद्धिक क्षमता, तांत्रिक ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान समज, सामान्य ज्ञान आणि मूल्यांकन या विविध निकषांवर विद्यार्थ्यांची कसोटी पाहिली गेली. डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी सर्व फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांकाचा बहुमान मिळवला.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक या उल्लेखनीय यशाबद्दल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे आणि सर्व विश्वस्त यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच, संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल. एस. अडमुठे आणि इटीसी विभागप्रमुख डॉ. एस. ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनाचे कौत
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.