कडवई गावच्या शिमगोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण
काठ्यांनी उभा केला जाणारा माड आणि बहिणीच्या पालखीची भेट खास आकर्षण
कडवई, ता. संगमेश्वर –दिपक तुळसणकर
दिनांक १२ मार्च
कडवई गावच्या शिमगोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, १३ मार्चला रात्रीची होळी आणि १४ मार्चला दिवसाची होळी साजरी केली जाणार आहे. शिमगोत्सवाचा हा पारंपरिक सोहळा अनुभवण्यासाठी चाकरमानी, पाहुणे आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

रात्रीच्या होळीचा सोहळा (१३ मार्च)
▶ दुपारी १२:०० वाजता – विधीवत पूजा व देवीचे रुपे लावण्याचा विधी
▶ दुपारी २:०० वाजता – सर्व गावकरी, मानकरी आणि पुजारी देवीचा माड आणण्यासाठी निघणार
▶ संध्याकाळी – माड नाचवत देवळाजवळ आणून ठेवला जाणार
▶ रात्री १२:३० वाजता – पालखी माडाला सामोरी जाऊन नाचवली जाईल
▶ पहाटे ४:०० वाजता – काठ्यांच्या सहाय्याने माड उभा करण्याचा अनोखा सोहळा
▶ भद्रा पावल्यानंतर – होम विधी पार पडणार
दिवसाची होळी (१४ मार्च)
▶ दुपारी १२:०० वाजता – दिवसाचा माड आणण्यासाठी गावकरी निघतील
▶ संध्याकाळी ४:०० वाजता – माड उभा केला जाईल आणि होम विधी पार पडेल
१५ मार्चला बहिणीच्या पालखीची भेट – अविस्मरणीय सोहळा
▶ किंजळकरवाडी येथे कडवई ग्रामदैवत आणि शिंदे-आंबेरी ग्रामदेवतेच्या पालख्यांची भेट होणार
▶ या भव्य सोहळ्यास हजारो भाविक उपस्थित राहतील
▶ पालखीची भोवनी सुरू होऊन शिमगोत्सवाची सांगता रामनवमीला होईल
या परंपरागत आणि भव्य शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी आणि ग्रामदैवताच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.