एक राखी पत्रकारांसाठी’ सोहळा श्रीमंत गंगामाई शाळेत उत्साहात
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१९: श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, इचलकरंजी येथे ‘एक राखी पत्रकारांसाठी’ हा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील पत्रकार बांधवांना विद्यार्थिनींनी स्वतःच्या हस्ते तयार केलेल्या राख्या बांधून सन्मानित केले. या सोहळ्यात संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर, मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षिका व्ही. एस. लोटके व एस. एस. कोळी यांच्या हस्ते पत्रकार बांधवांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे, संपादक फिरोझ शेख, हुसेन कलावंत, अरुण वडेकर, दर्शन फडतारे, सुनील मनोळे, धर्मराज जाधव, अतुल आंबी, सुभाष भस्मे, निखिल भिसे, अभिजित पटवा, पंडित कोंडेकर, डॉ. पांडुरंग पिळणकर, शरद सुखटणकर, रसुल जमादार, अंकुश पोळ, अरुण काशीद, सलीम संजापुरे, विक्रम खांडेकर, राजू म्हेत्रे, वृत्तपत्र विक्रेता श्रीरंग साने आदी मान्यवरांचा समावेश होता.

मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पत्रकार रामचंद्र ठिकणे यांनी शाळेचा पागा इमारतीपासून आजच्या भव्य इमारतीपर्यंत झालेला प्रवास व पत्रकार बांधवांचा सहभाग अधोरेखित केला. श्रीमंत गंगामाई शाळेचे नाव जिल्ह्यातील नामांकित शाळांमध्ये आदराने घेतले जाते, असेही त्यांनी नमूद केले.
संस्थेचे विश्वस्त अहमद मुजावर यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व उत्साह वाढतो, असे सांगितले. पत्रकार समाजातील घडामोडी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात, याचे ऋण व्यक्त करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
स्वागत व प्रास्ताविकात पर्यवेक्षिका व्ही. एस. लोटके यांनी कार्यक्रमाच्या उद्देशाचे विवेचन केले. मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी यांनी शाळेच्या उपक्रमांना सदैव पाठिंबा देणाऱ्या पत्रकारांचे कौतुक करून शाळा व पत्रकार यांच्यातील सकारात्मक समन्वय विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरतो, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एस. रॉड्रीग्युस यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक डी. डी. कोळी, एस. एच. मुजावर, क्रीडा प्रमुख बी. एस. माने, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित हो
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.