श्रीमंत गंगामाई शाळेत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात
इचलकरंजी:विजय धुत्रे
दि .१९ : श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेचे विश्वस्त मा.श्री. सुरेंद्रजी बांगड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण देशभक्तीमय केले. प्रमुख अतिथी मा.श्री. बांगड यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका सौ. ए. एस. काजी यांनी प्रामाणिकपणा व आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करण्याचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात नवसाक्षर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात दहावा व एमटीएस परीक्षेत चौथा क्रमांक मिळविल्याबद्दल कु. संस्कृती संतोष आबाळे हिचा व तिच्या पालकांचा गौरव झाला.
यावेळी चेअरमन मा. मारुतराव निमणकर, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, पर्यवेक्षिका व्ही. एस. लोटके, पर्यवेक्षक एस. एस. कोळी यांच्यासह शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.