Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .२ : इचलकरंजी शहरात पहिल्यांदाच अत्यंत शुध्द व तंत्रशुध्द पध्दतीचे खाद्यतेलाच्या उपलब्धतेने एक नवीन पर्वणीच मिळाली आहे. इचलकरंजी शहरात वरद विजय फातले व सहकाऱ्यांनी मिळून अत्यंत शुध्द व आरोग्याला पूरक असे कोल्ड प्रेस्ड ऑईल आणले आहे. त्यांच्या पूर्णब्रह्म कोल्ड प्रेस्ड ऑइल या खाद्यतेल उत्पादन व विक्री केंद्राचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे यांचे हस्ते पार पडला.
आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे मानवाचे दैनंदिन खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने तेलाचाही समावेश असतो. आणि सध्याची हीच गरज ओळखून हातकणंगले तालुक्यात प्रथमतः पूर्णब्रह्म कोल्ड प्रेस्ड पध्दतीचे शुध्द स्वरुपातील खाद्यतेल उपलब्ध झाले आहे. यामध्ये शेंगतेल, मोहरी तेल व करडई तेल असणार आहे.याप्रसंगी राज्य वस्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, क.आ. इचलकरंजी जनता बँक व्यवस्थापक मंडळ चेअरमन सीए चंद्रकांत चौगुले, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले, सन्मती सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पाटील यांच्यासह विविध मान्यवर व फातले कुटुंबिय उपस्थित होते.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Prev Post
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.