मनसे इचलकरंजी शहर उपाध्यक्ष पदी सिकंदर दाऊद मुजावर यांची नियुक्ती
इचलकरंजी : राम आवळे
दि.३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार इचलकरंजी शहर मनसे उपाध्यक्ष पदी सिकंदर दाऊद मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती माजी निवड शहराध्यक्ष रवी गोंदकर यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील यांच्यासह शहरातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,“सिकंदर मुजावर यांच्या नेतृत्वामुळे इचलकरंजी शहर संघटन अधिक बळकट होईल. मनसेच्या विचारधारेचा प्रसार प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्यासाठी ही नियुक्ती महत्वाची ठरणार आहे.”
नव्या जबाबदारीनंतर मनसे शहर संघटनेत नवचैतन्य निर्माण होऊन, राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ज्वलंत विचारांना अधिक जोमाने बळ मिळेल, अशी अपेक्षा या वेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी उपस्थित नितीन कटके शहर उपाध्यक्ष, शहर सचिव संदिप पवार, शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे, मारुती वंजीरे,सौरभ संकपाळ,शाम येशाल,सौरभ चव्हाण , अर्जुन माळी, निलेश पाटील, मारुती जावळे, सतिश परांजपे, रोहित आगलावे, राजु नदाफ,रुस्तम रंगरेज, उपस्थित होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.