धमाकेदार नृत्य सादरीकरणात ‘इचलकरंजी फेस्टिव्हल 2025’ ची रंगतदार सांगता
विद्यार्थ्यांच्या अदाकारीला प्रेक्षकांची वाहवा; विजेत्यांचा आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते गौरव
इचलकरंजी: विजय धुत्रे
दि .६ :इचलकरंजी फेस्टिव्हल २०२५ ची सांगता धमाकेदार नृत्य सादरीकरणाने झाली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्यकलेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. या सोहळ्यातील विजेत्या संघांसह गौरी सजावट व घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेतील विजेत्यांना आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.

सकाळच्या सत्रात झालेल्या डान्स कॉम्पिटिशन स्पर्धेचा शुभारंभ शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहरातील मुख्याध्यापक व शिक्षक-शिक्षिकांच्या हस्ते श्रींची महाआरती करून झाला. यावेळी संजय लोटे, अशोक हुबळे, सौ. अलका शेलार, राजेंद्र घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. फेस्टिव्हलचे कार्याध्यक्ष अहमद मुजावर यांनी प्रास्ताविक केले तर स्वागत सेक्रेटरी शेखर शहा यांनी केले.

डान्स कॉम्पिटिशनमध्ये सर्व गटांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. लहान गटात जिझस इंग्लिश मिडीयम, व्यंकटराव हायस्कुल व डीकेटीई राजवाडा हायस्कुल यांनी तर मोठ्या गटात एकलव्य इंग्लिश मिडीयम, डीकेटीई नारायणमळा व डीकेटीई राजवाडा यांनी यश मिळविले. महाविद्यालयीन गटात डीकेटीई इंजिनिअरींग कॉलेज, डीकेटीई ज्युनिअर कॉलेज व द न्यू हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज यांनी विजेतेपद मिळविले. परीक्षक म्हणून सायली चोथे व निलम कोळेकर यांनी काम पाहिले. या वेळी गिरीजा हेरवाडे, मेघा भाटले, शितल सुर्यवंशी, सपना भिसे, सीमा कमते, अर्चना कुडचे, नजमा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेत रमेश पाटील (प्रथम), विलेषा संग्राम वेटे (द्वितीय), रोहन संभाजी मोरबाळे (तृतीय), अर्चित अभिजित जोशी (चतुर्थ) व प्रसाद प्रकाश परीट (पाचवा) यांनी यश मिळविले. तर हातकणंगले तालुका मर्यादीत गौरी सजावट स्पर्धेत सुमित शशिकांत पाटील (प्रथम), अभिषेक चंद्रकांत कुकडे (द्वितीय) व योगेश विलास बावणे (तृतीय) यांनी यश संपादन केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.