संजय घोडावत इन्स्टिट्यूट अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवी, आयटीआय, शॉर्ट टर्म. सर्व विभागास विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद.
पदवी अभियांत्रिकी आणि शॉर्ट टर्म कोर्सेस “प्रारंभ-२५” प्रेरणा कार्यक्रम उत्साहात संपन्न.
विश्वस्त विनायक भोसले यांनी पालकांना उद्देशून बोलताना म्हणाले “प्रत्येक पाल्याची क्षमता ओळखून त्याच्या करिअर घडवण्यासाठी पालकांनी संजय घोडावत शैक्षणिक संकुलावर दाखवलेला विश्वास कौतुकास्पद आहे. या संस्थेतून जागतिक दर्जाचे अभियंते निर्माण होतील याची खात्री आहे.” ते पुढे म्हणाले जिद्द, चिकाटी आणि सातत्य या तीन गुणांच्या जोडीने कोणतेही यश मिळवता येते आणि ते टिकवून ठेवता येते. जिद्द म्हणजे एखादे ध्येय साधण्याचा दृढनिश्चय आणि त्यासाठी सतत प्रयत्न करणे. चिकाटी म्हणजे अपयश किंवा नकारांना न घाबरता प्रयत्न करत राहणे आणि संकटे पचवून पुन्हा उभारण्याची क्षमता असणे. सातत्य म्हणजे एकाच कामात नियमितपणे आणि शिस्तबद्धपणे गुंतून राहणे. या तिन्ही गोष्टी मिळून एक व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात आपले ध्येय गाठू आपण यशस्वी होऊ शकतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सौ. शुभांगी महाडिक यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. रणजीत शिरोडकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सचिन कांबळे यांनी मानले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.
—
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.