दुर्ग बांधणी स्पर्धेत शिवभारत चौक व लक्ष्मीनारायण मंडळाला शिवभूषण पुरस्कार
अरुण मोरे युथ फाउंडेशनचा उपक्रम; ४८ मंडळांचा सहभाग, वक्तृत्व स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद
सांगली:मयुरी देशपांडे
दि.१६: अरुण मोरे (अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र शिवसेना पोलीस परिवार कल्याण विभाग) युथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक दुर्ग बांधणी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिवभारत चौक मंडळ आणि लक्ष्मीनारायण मंडळ यांना मान्यवरांच्या हस्ते ‘शिवभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.सांगलीवाडी परिसरातील तब्बल ४८ मंडळांनी दुर्ग बांधणी स्पर्धेत सहभाग घेतला होता. तर वक्तृत्व स्पर्धेतील लहान व मोठ्या गटांत २४ विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व सादर केले. या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ शिवसेनेचे सांगली जिल्हाप्रमुख प्रा. मोहन व्हनकंडे आणि माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांच्या हस्ते पार पडला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अरुण मोरे युथ फाउंडेशनचे संस्थापक तथा पोलीस सैनिक परिवाराचे जिल्हाध्यक्ष अरुण मोरे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, युवक व बालकांमध्ये इतिहासाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच दुर्गसंवर्धनाची आवड जोपासली जावी, या उद्देशाने दुर्ग बांधणी स्पर्धेचे आयोजन केल्याचे त्यांनी सांगितले. तर वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली भाषणकला विकसित करण्याची आणि शिवचरित्र प्रभावीपणे मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रा. मोहन व्हनकंडे यांनी अरुण मोरे यांच्या उपक्रमाचे कौतुक करून असा उपक्रम दरवर्षी आयोजित व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवरायांचा इतिहास जतन करण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण असून, युवक-युवतींसह लहान मुलांमध्ये इतिहासाविषयी अभिमान आणि आवड निर्माण करण्याचे काम या उपक्रमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुर्ग बांधणी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या मंडळांना शिवसेनेच्या वतीने ऐतिहासिक किल्ले दाखविण्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात सांगलीवाडी परिसरातील माजी सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. दुर्ग बांधणी व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.जिल्हा वक्तृत्व स्पर्धेमध्ये मोठ्या गटात श्री सिद्धेश्वर गुरुकुल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सिद्धनाथ तालुका -, जिल्हा- सांगली.या शाळेने पहिला क्रमांक पटकावला
यावेळी जिल्हा, राज्य आणि राष्ट्र लेवलच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आलासांगलीवाडीतील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अरुण मोरे युथ फाउंडेशनने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.