महालक्ष्मी टाइम्सचा दणका! कबनूर इंडो किड्स हायस्कूलमधील कचऱ्याचे साम्राज्य २४ तासांत साफ

कबनूर इंडो किड्स हायस्कूलमधील कचऱ्याचे साम्राज्य २४ तासांत साफ

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 

दि. ११ : कबनूर येथील इंडो किड्स हायस्कूलच्या आवारातील कचऱ्याच्या साम्राज्याबाबत महालक्ष्मी टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा मोठा परिणाम झाला आहे. बातमी प्रकाशित झाल्यानंतर केवळ २४ तासांतच ग्रामपंचायत प्रशासन व शाळा प्रशासनाने तातडीने स्वच्छतेची मोहीम राबवून परिसर स्वच्छ केला.

पूर्वी …..

आत्ता …

 

शाळेच्या आवारात प्रचंड कचरा, दुर्गंधी व डासांच्या त्रासामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पालक व स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत व शाळा प्रशासन ढकलाढकली करत होते. मात्र महालक्ष्मी टाइम्सच्या कडक वार्तांकनामुळे प्रशासनाला जाग आली.

पालक व नागरिकांनी या तातडीच्या कारवाईचे स्वागत केले असून, “माध्यमांच्या दबावामुळेच जबाबदार यंत्रणा कामाला लागते” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, महालक्ष्मी टाइम्सचा आवाज म्हणजे जनतेचा आवाज असून, निष्काळजी प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्याचे काम आमचे वृत्तपत्र सातत्याने करत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.