कबनूरमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी

कबनूर : हबीब शेख दर्जी 
दि .१६ : अमन कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक तरुण मंडळ, कबनूर यांच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर जयंती (ईद-ए-मिलादुन्नबी) रविवार, दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमात नात गायन, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, गोरगरीब महिलांना साड्यांचे वाटप तसेच अमन गौरव पुरस्कार वितरण असे उपक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. कैशभाई बागवान, मा. श्रीरंग खवरे, श्री. रवि जावळे, सरपंच सौ. सुलोचना कट्टी व उपसरपंच श्री. सुधीर शिंगाडे उपस्थित होते.

नात गायन करणाऱ्या मुलांचा सत्कार व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मा. श्रीरंग खवरे व श्री. रवि जावळे यांच्या हस्ते करण्यात आले. गोरगरीब महिलांना साड्यांचे वाटप सरपंच सौ. सुलोचना कट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. तर अमन गौरव पुरस्कार मा. कैशभाई बागवान यांच्या हस्ते आलताफ जकाते (सर), ॲड. मेहबुब बाणदार, डॉ. कल्पेश कोळी, इम्तियाज म्हैसाळे, रफीक नरंदेकर, राजु अजगर, ॲड. अबिद बागवान, अमानुल्ला बरचे व अभिषेक वाळवेकर यांना प्रदान करण्यात आले.

प्रमुख पाहुणे श्री. कैशभाई बागवान, निलेश पाटील, रवि जावळे, सुधीर लिगाडे व जावेद फकीर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सैफ मुजावर, समीर जमादार, नजरुद्दीन मुजावर, जावेद इनामदार, शाफीर सय्यद, रमजान मुजावर, रमजान फकीर, पापालाल फकीर आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक पदाधिकारी दिलावर पटले, गणी मुल्ला, मुस्ताक मुल्ला यांनी केले. अध्यक्ष दस्तगिर मुजावर, उपाध्यक्ष शाकीर शेख, सेक्रेटरी मुजीब चौगुले, खजिनदार मुआज मुल्ला व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या संयोजनात हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक दिलावर पटले यांनी केले, तर खजिनदार मुआज मुल्ला यांनी आभार मानले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.