महिलांनी उद्योगात भरारी घेवून आत्मनिर्भर व्हावे

नगराध्यक्षा ॲड. सौ.अलका स्वामी यांचे आवाहन

इचलकरंजी: संजय आंबे
          दि:२२ महिला उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी रोटरी क्लब अँन्सचा दिवाळी धमाका महिलांसाठी मोठी पर्वणी असते. या माध्यमातून महिलांनी उद्योगात भरारी घ्यावी व आत्मनिर्भर व्हावे,असे आवाहन नगराध्यक्षा ॲड. सौ.अलका स्वामी (वहिनी ) यांनी केले.रोटरी कल्ब आॕफ इचलकरंजी अॕन्स वतीने आयोजित महिलांसाठीच्या दिवाळी धमाकाचा शुभारंम नगराध्यक्षा.सौ अलका स्वामी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
शुक्रवार व शनिवार या दोन दिवस चालणाऱ्या दिवाळी धमाकामध्ये महिलांना विविध स्टॉल उपलब्ध करण्यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गृहोपयोगी  वस्तू,कॉस्मेटिक्स, गारमेंट्स, संसारोपयोगी वस्तू, इमिटेशन ज्वेलरी,ड्रेस मटेरियल, होम फर्निचर, डेकोरेटिव्ह मटेरियल तसेच देशी-विदेशी खाद्यपदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत.या सर्व स्टॉलची पाहणी करत ग्राहक ते विक्रेते, कमी व वाजवी दरात थेट विक्री होणाऱ्याया दिवाळी धमाकाचे कौतुक नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी केले.यावेळी रोटरी ॲन्सच्या अध्यक्षा सौ. अलका रावळ,प्रोजेक्ट चेअरमन सौ. स्मिता नाकिल, सेक्रेटरी सौ. मेघा घायतिडक,सौ. स्वाती सातपुते,सौ पुष्पा धुत यांसह रोटरी कल्बचे पदधिकारी तसेच महिला उद्योगजिका उपस्थित होत्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.