जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त १४ ऑक्टोंबरला ग्रीन बिल्डिंग विषयावर व्याख्यान

शहरातील आर्किटेक्ट यांचा पुरस्काराने होणार गौरव

इचलकरंजीविजय मकोटे 
दि .१२ : जागतिक आर्किटेक्चर दिनाचे औचित्य साधत असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील प्रसिध्द आर्किटेक्ट उदय सावंत, अभय पिसे आणि सचिन बोरा यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ग्रीन बाबा अशी ओळख असलेल्या आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांचे ग्रीन बिल्डिंग ॲन्ड कम्युनिटीज या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजीचे प्रेसिडेंट राजेंद्र खंडेराजुरी, सेक्रेटरी विकास नाईक, अल्ट्राटेक सिमेंटचे डिलर नितीन धुत व घनश्याम सावलानी यांनी दिली.

असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अॅन्ड आर्किटेक्ट इचलकरंजीच्या वतीने दरवर्षी जागतिक आर्किटेक्चर दिन साजरा केला जातो. यंदाही अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता तोष्णीवाल गार्डन याठिकाणी हा समारंभ होत आहे. इचलकरंजी शहर परिसरासह विविध ठिकाणी निवासी आणि औद्योगिक क्षेत्रात विविध प्रकल्पांची उभारणी करण्यासह आर्किटेक्ट क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या आर्किटेक्ट उदय सावंत, अभय पिसे आणि सचिन बोरा यांना गौरविण्यात येणार आहे. तर पर्यावरणाशी नाते जुळलेल्या आणि त्यातूनच ग्रीन बाबा अशी ओळख झालेल्या आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांचा यानिमित्ताने विशेष सत्कार अल्ट्राटेक सिमेंटचे विभागीय तांत्रिक हेड शितलराज सिंदखेडे आणि टेरीटरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर यांची हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजीचे जॉ. सेक्रेटरी भरत केटकाळे, ट्रेझरर नितीन शेट्टी, विवेक सावंत, विठ्ठल तोडकर, रवींद्र तोरस्कर, गिरीश मोकाशी, सुहास रुग्गे, प्रकाश मालवीय, अल्ट्राटेक सिमेंटचे हर्षल धुत, रोहित सावलानी, विभागीय तांत्रिक प्रबंधक कोल्हापूर सागर छांगाणी आदी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.