चैत्राली वडेकर हिची राष्ट्रीय खो खो स्पर्धेसाठी निवड
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर व जिल्हा क्रीडा अधिकारी अहिल्यानगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनींनी चैत्राली अवधूत वडेकर हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धा अयोध्या, उत्तर प्रदेश येथे होणार आहेत.
या यशस्वी कामगिरीसाठी श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट मा. श्रीनिवासजी बोहरा शेठजी, चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदयजी लोखंडे, ट्रेझरर श्री महेशजी बांदवलकरसो, मानद सचिव श्री बाबासो वडिंगे साहेब, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारोतराव निमनकर साहेब तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे मौलिक सहकार्य लाभले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका, ए. एस काजी मॅडम, उपमुख्याध्यापिका सौ व्ही एस लोटके, उपप्राचार्य व्ही जी पंतोजी, पर्यवेक्षक एस एस कोळी, पर्यवेक्षिका एन एम कांबळे , ज्येष्ठ शिक्षक डी डी कोळी या सर्वांनी तिचे अभिनंदन केले.जिमखाना प्रमुख बी एस माने, क्रीडा शिक्षक के ए पाटील व्ही.के पाटील,कोच अमोल मेटे व अवधूत वडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.