शरद पॉलिटेक्निकच्या प्रकल्पाला ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट’ अवार्ड
आयएसटीईकडून पुणे य़ेथे प्रदान : कॉलेजला ‘बेस्ट चॅप्टर चेअरमन’चा सन्मान
यड्राव: राम आवळे
दि : २०: नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) कडून यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्निकला ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट’ व ‘बेस्ट चॅप्टर चेअरमन’ हे दोन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट रिसर्च येथे झालेल्या महाराष्ट्र-गोवा विभागीय पुरस्कार प्रदान कार्यक्रमात देण्यात आले.
आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. प्रताप देसाई, पुणे विद्यापीठाचे प्रो. व्हाईस चान्सलर डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते शरद पॉलिटेक्निकचे प्राचार्य बी. एस. ताशीलदार, आयएसटीई कमिटी हेड प्रा. योगेश वसवाडे, विद्यार्थी कृष्णसिंह हजारी, सोहम पांढरपट्टे यांनी स्विकारला.
विद्यार्थी कृष्णसिंह हजारी, सोहम पांढरपट्टे, हर्षवर्धन गवळी, प्रीत जाधव यांनी केलेल्या मिलिटरी क्षेत्रातील संरक्षण कामात सहाय्य करणारे प्रकल्प बनविले आहे. त्यांच्या या संशोधनाला डिफेन्स विभागातील या प्रकल्पाला ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट’ अॅवॉर्ड मिळाला. विद्यार्थ्यांच्या ह्या प्रकल्पाला प्रा. पी. व्हि. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
शरद पॉलिटेक्निकने फॅकल्टी डेव्हलेपमेंट प्रोग्रॅम, इंडक्शन प्रोग्रॅम, प्रशिक्षण कार्यशाळा, प्रोजेक्ट स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन, क्युझ कॉम्पीटेशन असे विविध उपक्रम राबविले आहेत. त्यासोबत आयएसटीई चॅप्टर अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध इव्हेंट घेण्यात आले आहेत. त्यामुळे महाविद्यालयास बेस्ट चॅप्टर चेअरमन पुरस्कार मिळाला आहे.
उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच महाविद्यालयात राबविण्यात येणा-या शरद पॅटर्न, व्हॅल्यू एडेड प्रोग्रॅम, प्रोजेक्ट बेसड लर्निंग, युजी फेलोशिप तसेच ऑटोमेशन आणि रोबोटिक्सचे सेंटर ऑफ एक्सलन्ससह इनोव्हेशन सेंटर, शरद स्टार्टअप सेंटर, प्रथम वर्षापासून प्रोजेक्ट, इंटरशीप, विद्यार्थी व प्राध्यपकांसाठी सातत्याने अॅक्टीव्हीटीचे आयोजन या सर्वांचे परिक्षण करुन या अवार्डसाठी निवड करण्यात आली आहे.
इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) च्या ह्या पुरस्कार म्हणजे शैक्षणिक संस्थेने केलेल्या कार्याचा उचित गौरव असल्याचे मत संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी व्यक्त केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.