सहकार महर्षी स्व. दत्ताजीराव कदम (अण्णा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर-शिरोळच्यावतीने विनम्र अभिवादन

शिरोळ: राम आवळे 

दि .२० : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन, माजी खासदार, सहकार महर्षी स्व. दत्ताजीराव बाबूराव कदम अण्णा यांची पुण्यतिथी श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारती समोर उभारण्यात आलेल्या स्व. कदम अण्णांच्या पुर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करुन साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडीत गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. कदम अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच स्व. सा. रे. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी, स्व. दिनकरराव यादव यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास संचालक रणजित अशोक कदम यांनी व स्व. विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास व्हाईस चेअरमन शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करुन अभिवादन केले.


यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक बसगोंडा पाटील, अॅड. प्रमोद पाटील, निजामसो पाटील, दरगू गोपाळ माने-गावडे, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, इंद्रजित पाटील, महेंद्र बागे, विजय सुर्यवंशी, मलकारी तेरदाळे, रावसाहेब नाईक, कामगार संचालक प्रदिप बनगे, माजी नगरसेवक अजय भोसले, महादेव कुलकर्णी, उत्तम पाटील, शितल सदलगे, सुदर्शन माणगांवे तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, मॅनेजर फायनान्स संजय भोसले, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, वर्क्स मॅनेजर आय. एम. मुल्लाणी, इनचार्ज प्रॉडक्शन मॅनेजर एम. एस. जाधव, ऊस पुरवठा अधिकारी अमर चौगुले, सिव्हील इंजिनियर जयंता जंगम, सिव्हील इंजिनिअर यशवंतराव माने, अनिलकुमार सुतार, सॅनेटरी इन्स्पेक्टर बाळासाहेब गावडे, गेस्टहाऊस इनचार्ज शक्तिजीत गुरव, गार्डन सुपरवायझर प्रमोद पाटील, एचआर मॅनेजर जयदिप देसाई, हेड टाईम किपर राजेंद्र केरीपाळे, ऊर्जाकुर मॅनेजर व्ही. आर. इंगळे, स्टोअर किपर एस. व्ही. शिंदे, चिफ सिक्युरिटी ऑफिसर पी. एम. चौगुले, पीएटू चेअरमन विलास माने, ओ.एस. अशोक चौगुले, आयटीआयचे प्राचार्य बी. बी. पाटील याचप्रमाणे कामगार सोसायटी, कामगार कल्याण मंडळ, शर्करा औद्योगिक श्रमिक संघ (इंटक), श्री दत्त भांडार, श्री दत्त ऊस तोडणी वाहतूक संघटना या संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते आणि कारखान्याचा कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.