सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिरात बालसभा उत्साहात
कबनूर : हबीब शेख दर्जी
दि .२३: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, इचलकरंजी येथे दिनांक १८ नोव्हेंबर २०२५ रोजी बालसभेचे आयोजन उत्साहात पार पडले. सदर कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता ६ वीच्या विद्यार्थ्यांनी जबाबदारीने सांभाळले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद कु. दुर्वा कोराणे हिने भूषविले तर आकर्षक सूत्रसंचालन कु. अनुष्का खोत हिने केले. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपली मनोगते प्रभावीपणे व्यक्त करत कार्यक्रम रंगतदार बनविला.

कार्यक्रमात संस्थेचे समन्वयक मा. श्री. अशोक वसगडे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांना थोर महापुरुषांची प्रेरणादायी माहिती दिली. तर मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापुरे व उपमुख्याध्यापिका सौ. शर्मिला माळी यांनी मुलींना धाडसी बना, यशस्वी व्हा असा मार्गदर्शनपर संदेश दिला. या प्रसंगी वर्गशिक्षक श्री. अमित शिंदे, श्री. शितल यळगुडे, सौ. प्रतिक्षा उरुणकर यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता. बालसभा कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.