वार्षिक क्रीडा महोत्सव जल्लोषात सुरू

श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विद्यालयांचा उपक्रम

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी 

दि:२: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालविद्यामंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज तसेच कुसुम ऑलिम्पियाड यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२५-२६ चा वार्षिक क्रीडा महोत्सव आज विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व क्रीडा ज्योती पूजनाने झाली. मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योती प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्रीडा शपथ देऊन स्पर्धांना प्रारंभ झाला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. पांडुरंग मानसिंग शिलेदार उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष मा. सुभाष केटकाळे, तर संस्थेचे समन्वयक मा. अशोक वसगडे उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे मा. पांडुरंग शिलेदार सर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरक संदेश देताना सांगितले की,“शरीर विकसित व्हायचे असेल तर खेळ अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमावावे,” असे त्यांनी उदाहरणांसह सांगितले.संस्थेचे उपाध्यक्ष मा. सुभाष केटकाळे यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. निवास तोडकर सर, प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख सौ. केतकी काळे, तर आभार प्र. सौ. प्रतिभा बावचे यांनी मानले.या प्रसंगी हायस्कूल व कॉलेज प्राचार्या सौ. वैशाली मंगसुळे, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापुरे, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.