केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार कडवई, ता. संगमेश्वर

कडवई, ता. संगमेश्वर:दीपक तुळसणकर,

दि.४ डिसेंबर २०२५ : जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा २०२५-२६ केंद्र कडवई, उर्दू प्रभाग अंतर्गत मोठ्या उत्साहात पार पडल्या. केंद्रातील बारा शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्राचे केंद्रप्रमुख तथा कडवई कुंभारवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. लक्ष्मीमाता तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करून स्पर्धांची सुरुवात झाली.

स्पर्धेच्या आयोजनासाठी शशिकांत साळुंखे, मधुकर वाजे, रामराव देवपूजे, श्रीकृष्ण ताडे, समाधान पाटील, मुकुंद देशपांडे, दीपक टक्के, विजय माळी, अमोल इंजले, संतोष शिंदे, भागवत तौर, कुलदीप गिरासे, अमोल भांगरे, नितीन झगडे, सौ. सुनीता लेंडवे, निकहत मुल्ला, सुनीता भांगरे, सुलभा कदम, संतोष जोनवाल (आरोग्य सेवक कडवई) यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी माननीय विजयजी परीर, शिक्षण विस्तार अधिकारी माननीय अण्णासाहेब बळवंतराव, तालुका समन्वयक समीर काब्दुले, महाराष्ट्र उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. रिजवान कारगीर, सरपंच सौ. विशाखाताई कुवळेकर, उपसरपंच श्री. दत्ताराम ओकटे, ग्रामसेवक चौधरी, पोलीस पाटील ओकटे, माजी पोलीस पाटील रमेश तुळसणकर, माजी सरपंच प्रकाश कुंभार, कोंड प्रमुख हरिश्चंद्र धामणाक,अंगणवाडी सेविका राजश्री सावरटकर मदतनीस सानिका कुंभार श्रीरंग कुंभार, पत्रकार दीपक तुळसणकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सोनाली कुंभार व पदाधिकारी तसेच कडवई, यादववाडी, दोन्ही कुंभारवाडी येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळी चहा-नाश्ता व दुपारी जेवणाची सोय करण्यात आली होती. लहान गट आणि मोठा गट अशा दोन स्तरांवर सामने खेळवण्यात आले. नंतर वैयक्तिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विजेत्या व उपविजेत्या गटांना तसेच वैयक्तिक स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व मेडल्स उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करून तो यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल केंद्रप्रमुख श्री. रवींद्र कदम सरांनी सर्व शिक्षक, पालक व ग्रामस्थांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.