नागपूर :नंददत्त डेकाटे
दि:२३ उदासा तालुका उमरेड ‘प्रहार जनशक्ती ‘ शाखा उदासा, दुर्योधन शास्त्रकार शाखा प्रमुख उदासा यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साई गुलाब बाबा आय बँक नागपूर व ग्लोबल आधार केंद्र ,उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, ई- श्रमिक कार्ड शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला २७० लोकांना आपल्या नेत्रांची तपासणी करून घेतली.
यामध्ये ९० लोकांना माफक दरात चष्मे वाटप करण्यात आले व आर्थिक परिस्थिती नाजूक ११ गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी ७७ लोकांनी ई- श्रमिक कार्ड व २५ लोकांनी पॅन कार्ड बनवून घेतले. या कार्यक्रमाला उपस्थित साई गुलाब बाबा आय बँक चे संस्थापक संजय लहाने, व ग्लोबल आधार केंद्र संस्थापक कशिश जरीये, प्रहार तालुका अध्यक्ष उमरेड प्रफुल रामटेके, संपर्क प्रमुख संदिप कांबळे, ग्रामपंचायत सदस्य राकेश बावणगडे, सामाजिक कार्यकर्ते रावन लोखंडे, नरेश ठोंबरे, किशोर खोकले यांच्यासह गावातील नागरिकांनी कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थिती दर्शविली
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.