शरद आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये मंगळवारी मोफत आरोग्य शिबिर

यड्राव: राम आवळे

दि.८: येथील शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने मंगळवार दि. १२ रोजी मोफत सर्वरोग तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राष्ट्रीय परिचारिका दिनाचे औचित्य साधून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

     हे शिबिर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत महाविद्यालयाच्या रुग्णालय परिसरात होणार असून विविध आजारांवरील तपासणी, मार्गदर्शन व उपचार सल्ला नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे.शिबिरामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम, मधुमेह, कोलेस्टेरॉल, महिला आरोग्य, सांधे व पाठदुखी, तणाव व झोप विकार, पचनसंस्था विकार, त्वचा व केस आरोग्य, गुदमार्ग व अॅनो-रेक्टल रोग, पंचकर्म, कान-नाक-घसा व नेत्र तपासणी, वजन नियंत्रण, बालकांसाठी सुवर्णप्राशन तसेच ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शनही दिले जाणार आहे.

   तसेच ब्लड शुगर, ब्लड प्रेशर, बॉडी कॉम्पोझिशन, SpO2 आणि ECG या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. प्रकृती परीक्षण, आहार मार्गदर्शन आणि नाडी परीक्षणाचाही लाभ नागरिकांना घेता येणार आहे.या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शरद आयुर्वेद हॉस्पिटलच्या आयोजकांनी केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.