जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न
सांगली: अय्यान पटेल
दि.७: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत प्रकरणांवर केलेल्या कार्यवाहीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात झालेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, सांगली शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, नागरी हक्क संरक्षण पथकाच्या एस. व्ही. वागलगावे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत दाखल प्रकरणे, पोलीस विभागाकडील व न्यायालयात प्रलंबित प्रकरणे व सद्यस्थिती, जातीच्या दाखल्याची प्रलंबित प्रकरणे, समाज कल्याण विभागाकडे प्राप्त प्रकरणे, तक्रारी, अत्याचार पीडितांना नुकसान भरपाई आदि प्रकरणांचा आढावा घेतला.
यावेळी बाळासाहेब कामत यांनी प्रलंबित प्रकरणे, मागील इतिवृत्त, पोलीस विभागाकडील प्रलंबित प्रकरणे आदिंबाबत सविस्तर आढावा समितीसमोर दिला.बैठकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सामाजिक पुरस्काराच्या अनुषंगाने प्राप्त असणाऱ्या प्रस्तावांना जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत पात्र, अपात्रबाबत मंजुरी देण्यात आली व पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.