विद्यासन्मतीदास सेवा संस्थेच्या वैद्यकीय प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभ संपन्न
आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती
इचलकरंजी: विजय मकोटे
दि २६:विद्यासन्मतीदास सेवा संस्था कोल्हापूर संचलित, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे स्पर्धा परिक्षा निवासी मार्गदर्शन केंद्र, धर्मनगर या वास्तूचा उदघाटन सोहळा तसेच संतशिरोमणी प.पू. १०८ आचार्यश्री विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालय, प.पू.१०८ आचार्यरत्न बाहुबलीजी महाराज चिकित्सालय, प.पू. १०८ आचार्यश्री सन्मतीसागरजी महाराज रोग निदान केंद्राचा शिलान्यास कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे होते आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व साधूसंतांच्या आरोग्याची काळजी घेवून निरोगी त्यागी जीवन जगत असताना काही वैद्यकिय चिकित्सालयाची गरज पडली तर आचार्यश्री विद्यासागरजी महाराज आयुर्वेदिक चिकित्सालय त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल अशी ग्वाही युवासम्राट क्रांतीरत्न प.पू.१०८ आचार्यश्री चंद्रप्रभसागरजी महाराज यांनी चिकित्सालयाच्या शिलान्यास प्रसंगी दिली.
प.पू. १०८ आचार्यश्री धर्मसेनजी महाराज ससंघ, युवासम्राट क्रांतीरत्न प.पू. १०८ आचार्यश्री चंद्रप्रभसागरजी महाराज ससंघ सानिध्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र वास्तुचा उद् घाटन सोहळा झाला. तसेच वैद्यकीय सुविधा प्रकल्पाच्या इमारतीचा शिलान्यास राजेंद्र पाटील यड्रावकर, राजू शेट्टी, आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
प्रकल्पाचा आढावा प्राचार्य डॉ. संजय खोत यांनी स्वागत व प्रास्ताविकात घेतला. राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी अशा प्रकारच्या वैद्यकिय सेवा देणा-या चिकित्सालयास सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.समाजातील गरजा ओळखून आचार्यश्री चंद्रप्रभसागरजी महाराज यांनी आपले धर्मकार्य आखले आहे व त्यानुसार त्यांचे काम पदोपदी वाखाणण्यासारखे होत आहे. म्हणूनच सर्वसामान्य जनमानसातून त्यांच्या कार्यास भव्य स्वरुपात अनुमोदना प्राप्त होत आहे. असे उद्गार राजू शेट्टी यांनी काढले.
साधुसंतांना योग्य औषधोपचार सेवा व निवासाची व्यवस्था करुन त्यांचे आरोग्य चांगले राखण्याचा या चिकित्सालयाचा मुख्य उद्देश आहे. आर्थिकदृष्ट्या गरजू लोकांना अल्पमोबदल्यात वैद्यकिय सेवा देऊन त्यांचे जीवन सुखमय बनविण्याची भावना याप्रसंगी प.पू. १०८ आचार्यश्री चंद्रप्रभसागरजी महाराज यांनी व्यक्त केले.विशाल दादा पाटील व पृथ्वीराज पवार यांनी या कार्यास सहयोग देण्याचा मानस व्यक्त केला.लिंगायत समाजाचे महेशानंद स्वामींनी या प्रसंगी उत्तम आरोग्याबाबतच्या गुरुकिल्ल्या सर्वांना दिल्या. .
डॉ. श्रीकांत बाळगोंडा पाटील मोटके परिवार जयसिंगपूर यांनी या चिकित्सालयाच्या उभारणीसाठी २ एकर जमीन दान दिली आहे. या कार्यक्रमास – अखिल भारतीय दिगंबर जैन महासभा चे महामंत्री प्रकाशजी बडजात्या, धनराजजी बाकलीवाल, शिखरचंदजी पहाडिया मुंबई, ललीत गांधी,भालचंद्र पाटील उपस्थित होते.
औरवाड चंदनबाला ग्रुपच्या युवतींच्या मंगलवाणीने मंगलाचरण व शीतल फराटे यांच्या गुरुवंदनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. सूत्रसंचलन सौ. विद्या फराटे व सौ. डॉ. मनिषा बागवडे यांनी केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.