इचलकरंजी लायन्स क्लब तर्फे ७५ सफाई कामगारांना चादर वाटप

इचलकरंजी: संजय आंबे

                   दि:27-सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या येथील लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने नगरपालिकेच्या सफाई कामगारांना सोलापुरी चादर वाटप करण्यात आले.  लायन्स क्लबचे अध्यक्ष लक्ष्मीकांत भट्टड,  ट्रेझरर महेंद्र बालर, सेक्रेटरी शैलेंद्र जैन माजी प्रांतपाल विजयकुमार राठी, नगरसेवक मदन झोरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लबचे इतर पदाधिकारी, मान्यवर तसेच पालिकेचे सफाई कामगार उपस्थित होते.

         लायन्स क्लबतर्फ़े गोरगरीब गरजू कुटुंबाना, तसेच विध्यार्थ्यांना नेहमीच मदतीचा हातभार लावला जातो. काही दिवसापूर्वी पूरग्रस्त कुटूंबांना अन्नधान्य किट वितरण करण्यात आले होते. त्यानंतर आज सफाई कामगारांना चादर वाटप करण्यात आले, यामुळे लायन्स क्लबच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.