इचलकरंजी:विजय मकोटे
दि:२७ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भव्य किल्ला बांधणी स्पर्धा घेण्यात येणार आहे. आदरणीय गुरुवर्य महाजन गुरुजी यांच्या मागणीप्रमाणे व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या शिवतीर्थ प्रमाणे किल्याची प्रतिकृतीला प्राधान्य असेल. हि स्पर्धा शहराध्यक्ष अनिल डाळ्या व युवा मोर्चा प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. स्पर्धेचे अंतिम निणर्य परिक्षकांचे राहील. विजेत्या स्पर्धकाला आकर्षक बक्षीस व शिल्ड दिले जाणार आहे.
स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे असतील. स्पर्धा हि सर्व वयोगटासाठी असेल, स्पर्धकला प्रस्तुत किल्ल्याची ऐतिहासिक व भौगोलिक किमान माहिती असणे आवश्यक आहे. किल्ला हा आकर्षक, सुबक असावा. तसेच किल्ल्यांवर प्लास्टिक व चायनीज वस्तूंचा वापर केलेला नसावा, किल्ल्याची बाधणी हि नैसर्गिक वस्तूंचा वापर करून केले असावे. किल्ल्यावर मशालीचा व शिवकालीन मावळ्यांचा प्रति कृतीचा वापर करावा. किल्ल्यावरील मांडणी शिवमय असली पाहिजे. प्रवेश नोंदणी हि मोफत राहील. भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर कार्यालय येथे नोंदणी करावे.या करिता अरविंद चौगुले 8668304910 सुजय पवार 9527733536मनोज तराळ 7499315329, प्रवीण (आकाश) बनसोडे 8624835571
यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आला आहे
प्रवेशाचीअंतिम ता.२/११/२०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत असेल.तसेच परिक्षण दिनांक ०५ /११ /२०२१ ते ०७ /११ /२०२१ या कालावधीत राहील. तरी ह्या स्पर्धेत सहभाग घेऊन बालकांनी याचा लाभ घ्यावा असे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी आवाहन केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.