पंचतारांकित ‘सयाजी’ च्या उभारणीत पालकमंत्र्यांच्या’ मुद्रांकशुल्क चोरीचा’ भराव !

पालकमंत्रीनी आता तरी राजीनामा दयावा.: माजी महापौर सुनील कदम

 

कोल्हापूर : प्रतिनिधी

     दि:३० पंचतारांकित हॉटेल ‘सयाजी’ च्या खरेदीदारांमधील सहखरेदीदार यांनी खरेदी उपरांत आपआपसातील वाटणीपत्र करतेवेळी 100 रूपायांच्या स्टँप पेपरवर संमतीपत्र या मथळया खाली शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवत चार सहखरेदीदार यांनी आपसात वाटणीपत्र तयार करून 18 लाख 22 हजार रूपयांचे मुद्रांक शुल्क हे त्यावेळच्या हिशोबाप्रमाणे बुडवले या यासंदर्भात माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि माजी महापौर सुनिल कदम यांनी मुद्रांक शुल्क विभागाचे नोंदणी महानिरीक्षक आणि महाराष्ट्र राज्याच्या मुद्रांक नियंत्रकांकडे वस्तुनिष्ठ माहिती आणि पूरक कागदपत्रांसह तक्रार दाखल केली होती. दोघांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर नोंदणी महानिरीक्षक कार्यालयामार्फत कोल्हापूरच्या मुद्रांक जिल्हाधिका-यांना याबाबत सखल चौकशीचे आदेश दिले होते. त्यांनी केलेल्या चौकशीत सकृतदर्शनी तथ्य असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी हॉटेल सयाजीच्या शंभर रूपये मुल्य असलेल्या स्टँपवर संमतीपत्राच्या नावावर वाटणीपत्र करण्यात आल्याचे तथ्य समोर आले आहे. अशी माहिती माजी महापौर सुनील कदम यांनी पत्रकार बैठकीत दिली.

डी. वाय. पाटील विदयापीठाचे कुलपती संजय डी. पाटील त्यांचे बंधू आणि गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील, संजय डी. पाटील यांचे छोटे चिरंजीव पृथ्वीराज पाटील आणि ज्ञानशांती ॲग्रो फार्म्स लिमिटेड यांच्या नावाने हे मूळ खरेदीपत्र करण्यात आले होते. पालकमंत्री सतेज डी पाटील यांच्या पदाचा गैरवापर करत सि. टी. सर्व्हे कार्यालयतील अधिका-यांवर दबाव आणून बेकायदेशीर रित्या व अनाधिकाराने मुद्रांक शुल्क न भरलेल्या व नोदंणीकृत न झालेल्या संमतीपत्राच्या मथळ्याखालील वाटणी पत्राच्या आधारे स्वतःच्या नावे व वाटणी मिळकत पत्रीकेस दाखल केली व या नोंदणी आधारे करोडो रूपयांचे कर्ज उचल केली आहे. सदरच्या संमती पत्राचे/वाटणी पत्राचे मुद्रांक शुल्क बुडवल्याचे तकारीच्या अनुपगाने दखल घेऊन या प्रकरणात शासनाचे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 परिशिष्ठ 1 अनुच्छेद 46 अन्वये रू. 18,22,000/- या रकमेवर निष्पादणापासून दंड दर महा 2 टक्के या प्रमाणे माहे ऑक्टोबर 2021 अखेर रू.36,07,560/- इतका दंड असे एकूण रू. 54,29,560/- इतकी रक्कम वसूलीचा आदेश मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी 22.10 2021 रोजी केला आहे. सदरचे प्रकरणावरून पालकमंत्री यांनी मिळेल तिथे मिळेल ती शासनाची रक्कम बुडवण्याचा जणू सपाटा लावलेला आहे. तरी नैतिकता स्विकारत पालकमंत्री यांनी आता तरी राजीनामा दयावा अशी मागणी ही कदम यांनी केली आहे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.