गगनबावडा, मार्गेवाडीच्या उद्योजिका मिराताई पडवळ यांच्या घरी पालकमंत्री यांची भेट

फणसापासून उत्पादित केलेल्या पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देऊ :पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर:प्रतिनिधी

  दि. ३० : कृषि उद्योजिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या गगनबावडा तालुक्यातील मार्गेवाडी गावातील कृषि उद्योजिका मिराताई पडवळ यांची पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट घेऊन कृषि उत्पादनात नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. मिराताई पडवळ यांनी फणसापासून उत्पादीत केलेल्या पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पाठबळ देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिली.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज गगनबावडा तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी  गगनबावडा तालुक्यातील मार्गेवाडी गावातील कृषि उद्योजिका मिराताई पडवळ यांच्या ‘श्री गगनगिरी फूड्स’ ला भेट देवून उद्योजिका मिराताई पडवळ यांनी फणसापासून केलेल्या विविध उत्पादनांचे कौतुक केले. हे कौतुक करताना मिराताई पडवळ यांनी कृषि उत्पादनात नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी केल्याबद्दल त्यांना कृषि उद्योजिका पुरस्काराने सन्मानित केल्याचेही त्यांनी नमुद केले.

एक महिला शेतकरी म्हणून मिराताई पडवळ यांनी कृषि उत्पादनात नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांनी  फणसापासून उत्पादित केलेल्या पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पाठबळ देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी दिली. तसेच आरोग्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या फणसाचे बाय-प्रॉडक्ट पडवळ कुटुंबीय घरीच तयार करतात. यामुळे गावातील अन्य महिलांना रोजगारसुद्धा उपलब्ध झाला असल्याचे सांगितले. तर हे प्रॉडक्ट्स स्थानिक बाजारामध्ये आणि ऑनलाईन पद्धतीनेसुद्धा विकले जात असून भविष्यात याला व्यापक प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होईल, असेही पालकमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.