रत्नागिरी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात; ६,४७९ अर्ज प्राप्त

रत्नागिरी: सचिन पाटोळे

दि.१३: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई व चालक पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून या भरतीसाठी एकूण ६,४७९ अर्ज प्राप्त झाले आहेत. मैदानी शारीरिक चाचणी दि.१३ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत (रविवार वगळता) आयोजित करण्यात आली आहेमा.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बनाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रिया पारदर्शक, निष्पक्ष व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडणार आहे. दररोज सकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, एमआयडीसी मिरजोळे (बाफना मोटर्सजवळ) येथे चाचणी होणार आहे भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी प्रवेशपत्र, ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे, वेळेवर उपस्थित राहणे, एजंट किंवा अफवांवर विश्वास न ठेवणे, तसेच स्पाईक शूज, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच व कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण मैदानात न आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उतेजक द्रव्ये किंवा कामगिरी वाढविणारी औषधे वापरण्यास सक्त मनाई असून नियमभंग आढळल्यास उमेदवाराला अपात्र ठरविण्यात येणार आहे.अडचण अथवा संशयास्पद हालचाल दिसल्यास Ratnasetu Chatbot (९३७१४१५६१२), डायल ११२ किंवा पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.