पंचगंगा साखर कारखान्याच्या ६४ वा गळित हंगाम शुभारंभ संपन्न
ऊसाला प्रतिटन ३०४० रुपये प्रमाणे एकरकमी एफ.आर.पी. दर देण्यार : चेअरमन पी. एम.पाटील
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि: ३१ गंगानगर कबनूर येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखाना लिज युनिट श्री रेणुका शुगर्स लि. या कारखान्याने चालू सन २०२१-२०२२ गळित हंगामाकरीता गळितास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३०४० रुपये प्रमाणे एकरकमी एफ.आर.पी. दर देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा पुढे चालू ठेवली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी व सभासदानी आपला पिकविलेला सर्व ऊस कारखान्यास गळितास पाठवून सर्वाधिक दराचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांनी केले.
कारखान्याचा चालु सालचा ६४ वा गळित हंगाम शुभारंभ पी. एम. पाटील व संचालक, रेणुका शुगर्स व्यवस्थापनाचे पदाधिकारी यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. प्रथम संचालक धनगोंडा पाटील व त्यांच्या पत्नी सौ. कुसुम पाटील यांच्या हस्ते ऊस वजनकाटा पूजन व ऊसाने भरलेल्या बैलगाडीचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी बैलगाडीवान रामा हिंगणे, दादासो मुल्लाणी व ऊस उत्पादक धनंजय कोले यांचा सत्कार करण्यात आला.
पी. एम. पाटील म्हणाले, कारखान्याने मागील गळित हंगामातही ऊसाला प्रतिटन ३०४०/- रुपये याप्रमाणे उच्चांकी एफ. आर. पी. दर देऊन एफ. आर. पी. ची संपूर्ण रक्कम आदा केली आहे. चालू गळित हंगामात कारखान्याने ९ लाख मे. टन ऊस गाळपाचे ऊद्दीष्ट ठेवले असुन चालू साली १८ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली आहे.ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, ऊस तोडणी व वहातूक कंत्राट- दार, कामगार यांचे सहकार्याने कारखाना ऊर्जिता- वस्थेत आला आहे.
स्वागत व्हा.चेअरमन जयपाल कुंभोजे यांनी केले. यावेळी एम. आर. पाटील, कुमार खूळ, सुनिल तोरगल, प्रताप नाईक, प्रताप पाटील, प्रमोद पाटील, भुपाल मिसाळ, संतोष महाजन, प्रकाश खोबरे, रावसाहेब पाटील, लक्ष्मण निंबाळकर, शेतकरी संघटना युवा प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील, प्र. का. संचालक नंदकुमार भोरे, रेणुका शुगर्स चे एक्झि. डायरेक्टर एस. आर. नेर्लेकर, जनरल मॕनेंजर प्रकाश सावंत, असि. जनरल मॕनेंजर केन सी. एस. पाटील, एचआर. मॕनेंजर संजय किल्लेदार, कामगार इंटक अध्यक्ष आझाद शेख, उपाध्यक्ष बापुसो उपाध्ये यांचेसह कामगार, सभासद उपस्थित होते. संचालक रावसाहेब भगाटे यांनी आभार मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.