छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१९: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या विद्यालयात दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केटकाळे, संस्थेचे समन्वयक मा.श्री.अशोक वसगडे हे उपस्थित होते. संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केटकाळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा, आस्ते कदम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुप्रिया त्रिगुणे व आभार सौ.वैशाली पाटील यांनी मानले. सदर कार्यक्रमास प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ.पुष्पा ऐनापूरे, मणेरे हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज प्राचार्या सौ.वैशाली मंगसुळे, कॉलेज विभागप्रमुख सौ.दिपाली चौगुले, बालवाडी विभागप्रमुख सौ.स्वाती ढेकळे तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.