Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
सांगली: अय्यान पटेल
दि.२७: राज्यातील उद्योग-व्यापार क्षेत्रातील प्रतिष्ठित संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या निमंत्रित सदस्यपदी मे. चिंचवाडे असोसिएट्सचे यशस्वी उद्योजक अमित जयपाल चिंचवाडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे औद्योगिक क्षेत्रात समाधान व्यक्त होत असून विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
अमित चिंचवाडे हे उद्योजक म्हणून उद्योग व्यवस्थापन, नवोन्मेषी संकल्पना आणि सामाजिक बांधिलकी यासाठी ओळखले जातात. मे. चिंचवाडे असोसिएट्सच्या माध्यमातून त्यांनी उद्योगवाढीसोबत रोजगारनिर्मितीला चालना दिली आहे. स्थानिक पातळीवर उद्योग-व्यवसायाला दिशा देताना त्यांनी तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचेही काम केले आहे.गव्हर्निंग कौन्सिलच्या निमंत्रित सदस्यपदी निवड होणे ही उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल मानली जाते. या पदाच्या माध्यमातून राज्यातील उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राशी संबंधित धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागाची संधी मिळणार आहे. चिंचवाडे यांच्या अनुभवाचा संस्थेच्या कार्याला सकारात्मक लाभ होईल, असा विश्वास उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.या निवडीबद्दल विविध व्यावसायिक संस्था, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. उद्योग क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी तसेच नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्याचा मानस चिंचवाडे यांनी व्यक्त केला आहे.अमित चिंचवाडे यांच्या निवडीमुळे स्थानिक उद्योगांना नवे प्रतिनिधित्व मिळाले असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.