गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी स्वामी समर्थ सेवा केंद्रात रक्तदान शिबीर

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 
दि.१५ :अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्‍वरचे पिठाधिश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. त्या अनुषंगाने नदीवेस नाका परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या सेवा केंद्रात अध्यात्मिक सेवांसोबतच समाजातील विविध घटकांच्या समस्या ऐकून त्यावर मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्याची परंपरा केंद्राने कायम ठेवली आहे. या सामाजिक जाणिवेतूनच रक्तदानासारखा महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला. या शिबिरात परिसरातील नागरिक, युवक आणि सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेकांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देत रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी व पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले. सामाजिक व मानवतावादी कार्याच्या माध्यमातून समाजसेवेची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.