महाराष्ट्र राज्य कष्टकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

शिरढोण : प्रमोद कांबळे

 दि:.10 शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य निराधार नागरिक यांच्यासाठी शासकीय योजनेचा लाभ मिळावा या प्रमुख मागणीसह पाच महिन्यापासून न मिळालेली पेन्शन लाभार्थ्यांना त्वरित मिळावी, लाभार्थ्याची तीन तीन वर्षे झाली फेर चौकशी चालू आहे ती तात्काळ पूर्णत्वास नेऊन त्यांचे प्रकरणे मंजूर करावेत, लाभार्थी जिवंत असताना वारंवार हयातीचा दाखला का मागितला जातो, वाढत्या महागाईमुळे प्रत्येक वृद्धांना तीन हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, संजय गांधी योजनेतील लाभार्थी 65 वर्षे वयाची अट रद्द करून 60 वर्षे करण्यात यावी ,उत्पन्न दाखला ची 21000 अट रद्द करून ती 50 हजार रुपये उत्पन्न दाखला करावी, शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांना संपूर्ण लाईट बिल माफ करावे, शेतमजुरांचे महामंडळ तात्काळ निर्माण करावे, शिरढोण मंडळ अधिकारी यांनी गायब केलेल्या प्रकरणाची चौकशी व्हावी शिरोळ तालुक्यातील लाभार्थ्यांची परिपूर्ण 92 प्रकरणे ऑनलाइन केली आहेत पण त्यांचा तपास लागत नाही या लोकांना न्याय मिळत नाही या गरिबांची प्रकरणे संबंधित अधिकारी यांनी गायब केली आहेत त्याची चौकशी होऊन 92 प्रकरणाचा तपास करण्यात यावा या सर्व मागण्यांसाठी शिरोळ तालुक्यातल्या शेतमजूर कष्टकरी वृद्ध दिव्यांग व व्याधिग्रस्त रुग्णाच्या समवेत संघटनेचे संस्थापक प्रमुख सुरेश सासणे विश्वास बालीघाटे .शोभाताई पंदारे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनास आझाद समाज पार्टीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष संतोष आठवले यांनी पाठिंबा व्यक्त करून आंदोलन संपेपर्यंत सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली या आंदोलनात शिरदवाड टाकवडे शिरढोण दत्तवाड या भागातील नागरीक मोठ्या संख्येने सहभाग घेतला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.