श्रीआर्य चाणक्य नागरी पत संस्थेस 3कोटी 98 लाखाचा विक्रमी नफा–चेंअरमन राशिनकर
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .१४ :- येथील श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पत संस्थेला मार्च २०२६अखेर निव्वळ नफा ३ कोटी ९८ लाख ८३ हजार रु.इतका झाला असून सभासदांना ११ टक्के लाभांश दिला जाणार असल्याची घोषणा चेअरमन राजेंद्र राशींनकर यांनी ३२ व्या वार्षिक सभेत केली.लायन्य ब्लड बँकेच्या हॉल मध्ये वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली.
प्रारंभी प्रतिमा पूजन झाले यानंतर श्रद्धांजलीचा ठराव नरोत्तम लाटा यांनी मांडला. कार्यक्रमात प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष जवाहर छाबडा यांनी केले त्यांनी दहा शाखातुन कामकाज चालू असून २६० कोटीच्या ठेवी असून १९४ कोटीचे कर्ज वाटप झाले आहे. पैकी तीन कोटीचे जामीनकी कर्ज असून उर्वरित सोने तारण व स्थावर तारण आहे सर्व कर्जे सुरक्षित असून संचालकाना मिटींग भत्ता व कर्ज दिले जात नाही. तसेच मिश्र व्यवसाय ५४३ कोटीचा आहे तो ५०० कोटी होईल यामुळे नफा ही वाढेल असे सांगत सामाजिक बांधिलकी तुन विद्यार्थी अभ्यासिका, व्याख्यानमाला, सेवा भारती द्वारा कार्य चालू आहे असे सांगितले.
तर चेअरमन राजेंद्र राशीनकर यांनी ताळेबंद व अहवाल वाचन केले ठेवी साठी जाहिरात न करता २५१ कोटीच्या ठेवी असल्याचे सांगत कर्ज पुरवठा हा वाढत असून ३कोटी ९८लाख ८३ हजार या निव्वळ नफ्यातून सभासदांना ११ टक्के लाभांश दिला जाणार आहे अशी घोषणा केली. यावेळी वार्षिक सभा नोटीस वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अमित पोवार यांनी केले सर्व विषय एकमताने मंजूर झाले
यावेळी संस्थेच्या नूतन सल्लागार सदस्याचें व आदर्श कर्जदार यांचें स्वागत करण्यात आले तर उल्हास लेले सह मान्यवराचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे मुख्य पाहुणेसांगली अर्बन बॅंकेचें अध्यक्ष श्रीपाद खिरे यांनी पत संस्थेची प्रगती व समाज कार्य पहाता आदर्श संस्था आहे, असे सांगत समाधान व्यक्त केले शासन बॅंकें प्रमाणे बंधने घालत असून सभासदानी त्यांचे वाचन करावे असे आवाहन केले. पत नाही त्यांना ही कर्ज दिले पाहिजे यापुढे कर्ज कायद्यान्व यें वाटप होईल याकडे लक्ष वेधले.शेवटी आभारउपाध्यक्ष पंकज मेहता यांनी मानले. यावेळी संचालक व सभासद मोठ्या संख्येने हजर होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.