शरद इन्स्टिट्युटमध्ये राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा

दानोळी: कयूम शेख 

दि. १३: यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन प्रतिमा पूजनाने साजरा करण्यात आला. संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

            यावेळी ग्रंथालय क्षेत्रातील डॉ रंगनाथन यांच्या योगदानाची माहिती ग्रंथपाल युवराज पाटील यांनी दिली. डॉ. रंगनाथन यांनी ग्रंथालयाच्या कार्याला शास्त्रीय व शिस्तबद्ध स्वरूप देताना मांडलेली ‘ग्रंथालयशास्त्राची पंचसूत्री’ आजही ग्रंथालय व्यवस्थापनाचा मूलभूत आधार मानली जाते. त्यांनी विकसित केलेली ‘कोलन क्लासिफिकेशन’ ही पद्धत ग्रंथालयशास्त्राच्या इतिहासातील महत्त्वाची उपलब्धी मानली जाते. यावेळी ग्रंथपाल, विभाग प्रमुख, प्राध्यापक व ग्रंथालयातील सर्व स्टाफ उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.