दरोडा गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात देवरुख पोलीसांना यश. रत्नागिरी पोलीस दलाची उत्कृष्ठ कामगिरी.
रत्नागिरी : नियाझ खान
दिनांक-०८/०४/२०२६ : आज रोजी फिर्यादी प्रथमेश तानाजी दळवी रा.शाहुवाडी, कोल्हापुर हे यांच्या ताब्यातील बोलेरो गाडी मध्ये वेतोशी ता. जि. रत्नागिरी येथुन सायंकाळी ६.३० वा. सुमारास ०१ म्हैस भरुन रत्नागिरी ते कोल्हापुर असा शिराळा, सांगली येथे घेऊन जात असताना आंबाघाट, दख्खन येथे आले वेळी पाठीमागील काचेवर पांडुरंग लिहिलेली थार गाडी क्रमांक एम.एच.०८/२७६७ व भारत सरकार असा स्टीकर असलेली इनोव्हा गाडी क्रमांक एम.एच.०८/ २०९९ मध्ये आलेल्या ०८ अनोळखी इसमाने फिर्यादीचे गाडीचे पुढे व मागे लावुन फिर्यादीला गाडीतुन खाली उतरवुन मारहाण व शिवीगाळी करुन तसेच चाकुचा धाक दाखवुन त्याला इन्व्होवा गाडीमध्ये जबरदस्तीने कोबुन गंद्रे पेट्रोलपंप साखरपा येथे आणुन फिर्यादी याला दमदाटी करुन व पोलीसांना काही सांगिलेस तर याद राख अशी धमकी दिली व त्यांचेकडे ५०,०००/- रु ची मागणी करुन त्यांचेकडील गाडीचे केबिनमध्ये ठेवलेले २५०००/- रु जबरदस्तीने काढुन घेऊन पोलीसात तक्रार केली तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली म्हणुन फिर्यादी यांनी दिले तक्रारी वरुन देवरुख पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ४७/२०२६ भा.न्या संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०९ (४),३१०(१),२०४, ११२, १४०, (२).१२७ (२) ११५(२). ३५१ (४) अन्वये दि.०९/०४/२०२६ रोजी ८ आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा.श्री.नितीन बगाटे, पोलीस अधिक्षक रत्नागिरी. व श्री.वी.वी. महामुनी अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सुरेश कदम उपविभागीय पोलीस अधिकारी लोजा, व उदय झावरे, पोलीस निरिक्षक, देवरुख यांनी तपास पथके तयार करून गुन्ह्यातील १) फरहान रशिद मुल्ला वय-४२.रा. कोकण नगर ता. जि. रत्नागिरी, २) प्रथमेश सचिन भाटकर, वय-२४ रा. गोळप ता. जि. रत्नागिरी, ३) सर्वेश सुभाष किर वय-२२ रा. सोमेश्वर किरबाग ता. जि. रत्नागिरी.. ४) धर्मलिगम विजयकुमार नाडर, वय-२६ वर्ष रा. कुवारबाव रत्नागिरी, ५) भुषण विपेंद्र सावंत, वय-२६ वर्षे, रा.मि-या भारतीय शिपयार्ड जवळ ता. जि. रत्नागिरी. अश्या एकुण ०५ आरोपींना तात्काळ अटक केलेली आहे. उर्वरीत फरार आरोपींचा शोध सुरु आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. नितीन बगाटे पोलीस अधिक्षक रत्नागिरी, श्री.बी.बी.महामुनी अपर पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी लांजा यांचे मार्गदर्शनाखाली उदय झावरे, पोलीस निरिक्षक, पोउनि. प्रमोद वाघाटे सपोफौ/११६७ शांताराम पंदेरे, पोहेकॉ/४९ प्रशांत मसुरकर, पोहेकॉ/१४३० सचिन कामेरकर, पोहेकॉ/१०२७ नितीन जाधव, पोकॉ/७३५ प्रशांत साळुंखे, पोकॉ/७९३ अमर सुतार, मपोकॉ/६८६ रेश्मा चव्हाण यांनी केलेली आहे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.