क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती व जयंती द्विशताब्दी वर्ष सामाजिक न्याय भवनात कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी: नियाझ खान 

दि. १३ : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती व जयंती द्विाशताब्दी वर्ष महोत्सव शुभारंभ कार्यक्रम 11 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे इतर मागास बहुजन कल्याण विभाग व महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि सामाजिक न्याय विभाग यांच्या एकत्रित समन्वयाने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते प्रा. आनंद शेलार उपस्थित होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक अपूर्वा कारंडे, महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रकाश आरेनवरू, वरिष्ठ समाज कल्याण निरिक्षक विजया मोरे आदी उपस्थित होते.

प्रा. आनंद शेलार यांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. प्रमुख पाहुणे प्रा.शेलार यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद तसेच इ.मा.ब.क शासकीय वसतीगृहातील उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थानींना आपल्या व्याख्यानातून क्रांतिसूर्य जीवन चरित्र्याबद्दल मार्गदर्शन केले. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडत त्यांच्या महान जीवनचरित्राचे दर्शन शेलार यांनी आपल्या व्याख्यानातून घडवले.

श्रीमती कारंडे यांनी आपल्या मनोगतातून प्रबोधन काव्य स्वरूपात क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन केले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त इ.मा.ब.क शासकीय वसतीगृह येथे आयोजित विविध स्पर्धांमध्ये प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. इ.मा.ब.क कार्यालय व अधिनस्त शासकीय वसतिगृहे, सामाजिक न्याय विभाग, महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकनेते शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील इतर महामंडळे मधील सर्व कर्मचारी सदस्यांच्या एकत्रित सहभाग व समन्वयातून क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती द्विशताब्दी वर्षाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.