डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी.

इचलकरंजी:विजय मकोटे 

दि. १४ एप्रिल२०२६; महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा शहर कार्यालय येथे इचलकरंजी महानगरपालिका मागासवर्गी कल्याण समिती सभापती रूबेन आवळे, नगरसेवक रवी रजपुते यांच्या हस्ते फोटो पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहीर संजय जाधव, सौ.काजल तोडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील भीम गीत गाऊन त्यांना भीम वंदना दिली.

          इचलकरंजी शहर पूर्व मंडलाचे अध्यक्ष श्रीरंग खवरे पश्चिम मंडलाचे अध्यक्ष शशिकांत मोहिते, भाजपा ज्येष्ठ नेते दीपक राशिनकर, अशोक स्वामी, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, गटनेते विठ्ठल चोपडे, जिल्हा परिषद सदस्य सानिका आवाडे,कबनूर पंचायत समिती सदस्या सौ.गौराबाई काडाप्पा, पूर्व मंडल महिला अध्यक्षा कमते, पश्चिम मंडल अध्यक्षा, नगरसेविका सौ.सपना भिसे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद बचाटे, सरचिटणीस महेश पाटील, शिवानंद रावळ, विनोद कंकानी, ऋषभ जैन, नगरसेवक प्रकाश दत्तवाडे, मारुती पाथरवाट, सतीश मुळीक, चांगदेव पाटील सौ.अलका स्वामी, सौ.पुनम माळी सौ.अरुणा बचाटे, संतोष शेळके, सुशांत कलागते, अजितमामा जाधव, सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, प्रदीप मळगे, संजय केंगार, राजेश रजपुते, नागुबाई लोंढे,  अरुण कुंभार, माधव उपाध्ये, म्हाळसाकांत कवडे, सलीम शिकलगार, तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.