इचलकरंजीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि .१८: शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गणेश नगर येथील श्रीराम सायझिंग येथे झालेल्या कार्यक्रमात विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष प्रियदर्शनी बेडगे, दशरथ माने, समीर जमादार आणि सुहास जांभळे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधानिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजी शिंदे, जनार्दन गोडसे, नारायण ताम्हणकर, प्रकाश नेमिष्टे, संजय नवाळे, नितीन क्षीरसागर, प्रवीण खाडे, पप्पू लोंढे, समीर सोलापुरे, रमेश कांबळे, आनंदा काटकर,मनाली नंदूरकर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा जागर ठेवण्याचा व समाजात समता, बंधुता आणि न्याय मूल्ये रुजविण्याचा संकल्प करण्यात आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.