महाराष्ट्र महापौर परिषदेत महापौरांच्या अधिकार व निधी प्रश्नांवर सखोल चर्चा

मुंबई: प्रतिनिधी 

दि. २६ एप्रिल २०२६ :
मुंबई येथे आज महाराष्ट्र महापौर परिषदेची २३  वी सभा उत्साहात पार पडली. या बैठकीस महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्षा तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ. रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते.या परिषदेस कार्याध्यक्ष श्री. रंजीत चव्हाण तसेच लक्ष्मण लटके सर यांचे मार्गदर्शन लाभले. राज्यभरातील बहुतांश महापौरांनी सभेला उपस्थित राहून विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.

बैठकीत महापौरांचे अधिकार, कामकाजातील अडचणी, महानगरपालिकेच्या कार्यप्रणालीची माहिती तसेच निधीअभावी येणाऱ्या समस्या यावर सखोल विचारमंथन करण्यात आले. महापौरांनी आपापल्या शहरांच्या विकासासाठी विविध कल्पना आणि कार्यपद्धती मांडल्या.

यावेळी अध्यक्षांनी सर्व मुद्द्यांची दखल घेत लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनिता पवार यांची भेट घेऊन महापौरांच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले.दरम्यान, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली असून सर्वानुमते नागपूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. नीता ठाकरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.एकूणच, या परिषदेमध्ये महापौरांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय व आर्थिक अडचणींसह शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपाययोजनांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.