सखीसहेली व आदर्शमाता पुरस्कार हे महिलांना प्रोत्साहन देणारे कार्य :

: माजी नगराध्यक्षा सौ. किशारी आवाडे यांचे गौरवउद्गार

इचलकरंजी:विजय मकोटे
 दि१६ नोोव्हेंब र: येथील रोटरी सेन्ट्रल एक्झिक्युटीव्ह प्रोबस क्लबच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा सखी सहेली व आदर्शमाता पुरस्कार सौ. किशोरी पडिया व सौ. सुरेखा मगदूम यांना माजी नगराध्यक्षा सौ. किशारी आवाडे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.स्वागत बाळासाहेब देवनाळ यांनी केले. प्रेसिडेंट विलासराव पाडळे यांनी प्रास्ताविकामध्ये क्लबच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती विशद केली. सौ. किशोरी आवाडे यांचा परिचय क्लबच्या सहसेक्रेटरी सौ. सुजाता कोईक यांनी करून दिला. खजिनदार सौ. हेमल सुलतानपुरे यांनी सौ. आवाडे यांचा तर क्लबचे सचिव शिवबसु खोत यांनी क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांचा सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना सौ. सुरेखा मगदूम यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तर त्यांची कन्या डॉ. सौ. सुनिता चौगुले यांनी आईबद्दल भावना व्यक्त करत माझी आई आदर्शमाता कशी आहे हे सांगिते. सखी सहेली पुरस्कारप्राप्त सौ. किशोरी पडिया यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून क्लबचे आभार मानले. क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी मागील पाच वर्षामध्ये केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. प्रमुख पाहुण्या सौ. किशोरी आवाडे यांनी प्रोबस क्लबच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी जे समाजामध्ये कार्य सुरू केले आहे ते कौतुकास्पद आहे. आज स्व. मंजिरी सातपुते यांच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात, त्यामुळे अनेक महिलांचे कार्य समाजापुढे येत असते, अशा उपक्रमांच्या माध्यमातून आपण जे कार्य करीत आहात त्याचा मला हेवा वाटतो आहे तसेच अशा कार्यक्रमात सहभागी होण्याचा मला आनंदच होतो असे सांगून वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी अजित कोईक, सौ. शारदा कवठे, सूर्यकांत बिडकर, दिलीप शेट्टी, शिवबसु खोत व अन्य मान्यवरांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमावेळी अरुणराव खंजिरे, राजेंद्र सांगले, इरगोंडा पाटील, प्रकाशराव दत्तवाडे, एम. के. कांबळे, सौ. अंजली बावणे, सौ. मिरा जोशी, सौ. ज्योत्सना खंजिरे, निशीकांत मगदूम, गजानन सुलतानपुरे, काशीनाथ जगदाळे, प्रकाश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी सौ. वर्षा कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. शारदा कवठे यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.