हात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये आणखी13 रूग्णालयांच्या समावेशासाठी शासनास प्रस्ताव : जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत निर्णय  

 सांगली: अय्यान पटेल

दि.12: महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी तेरा रुग्णालयांच्या समावेशाबाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

     जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे समन्वयक सुभाष नांगरे, समितीचे सदस्य रंगनाथ शिंपुगडे यांच्यासह रूग्णालयांचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालये कार्यरत आहेत. यामध्ये 16 शासकीय, 87 खाजगी,  70 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 11 शहरी आरोग्य केंद्रे, 121 उपकेंद्रे यांचा समावेश आहे. शासनास पाठवलेला प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर यामध्ये आणखी 13 खाजगी रूग्णालयांचा समावेश होणार आहे.

    या बैठकीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील आणखी 13 रूग्णालयांच्या समावेशाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रूग्णालयात उपलब्ध असणारे डॉक्टर्स, सोयीसुविधा , बेडची संख्या याचा आढावा घेण्यात आला. यामध्ये गाडवे हॉस्पिटल, तासगाव, मिरजकर आय हॉस्पिटल, आष्टा, यादव ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, शिराळा, सूर्या हॉस्पिटल, भिवघाट, स्वस्तिक हॉस्पिटल, मिरज, बेबी हॉस्पिटल, मिरज, अंकुर हॉस्पिटल, ईश्वरपूर, डॉ. घट्टे युरॉलॉजी हॉस्पिटल, मिरज, दाते हॉस्पिटल, कोयना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर, वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट ऑफ योगा, सांगली आणि अपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर या रूग्णालयांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये अंगिकृत करण्याबाबत माहिती देण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.