मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ संस्थेची निवडणूक बिनविरोध

चेअरमनदी प्रकाश दत्तवाडे तर व्हा.चेअरमनपदी निवृत्ती गलगले

इचलकरंजी:विजय मकोटे 
   दि. १४ :येथील मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ या संस्थेची सन २०२६-२०३१ या सालची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग सोलापूर उज्वला पळसकर यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा केली. त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या नुतन संचालक मंडळाच्या बैठकीत संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी निवृत्ती कृष्णाजी गलगले यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
शतक महोत्सवाकडे वाटचाल सुरु असलेल्या मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघ या संस्थेने सातत्याने पारंपारिक हातमाग व्यवसायाला चालना देण्याचे काम केले आहे. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विणकरांच्या विश्‍वासाचे केंद्र बनली आहे. हातमाग संस्कृती जपण्याचे कार्य केले आहे. या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी १३ जागांसाठी तितकेच अर्ज आल्याने संस्थेची निवडणूक बिनविरोध जाहीर करण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्री. नरुटे यांनी काम पाहिले. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग सोलापूर उज्वला पळसकर यांच्या अध्यक्षतेखाली नुतन संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते चेअरमनपदी प्रकाश दत्तवाडे आणि व्हाईस चेअरमनपदी निवृत्ती गलगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
  नुतन संचालक मंडळ याप्रमाणे:- प्रकाश ज्ञानबा दत्तवाडे, निवृत्ती कृष्णाजी गलगले, विश्‍वनाथ रामप्रसाद अग्रवाल, शिवानंद शंकर बन्ने, राहुल प्रकाश खंजिरे, शिवबसू शिवलिंग खोत, जयवंत केरबा म्हेतर, दत्तात्रय शंकरराव कित्तुरे (सर्वसाधारण गट), भारती जितेंद्र जानवेकर व समिना जुनेद हवालदार (महिला प्रतिनिधी)े, चंद्रकांत गजानन मांगलेकर (इतर मागासवर्गीय प्रतिनिधी), शिवानंद विष्णू घोडके (अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती), राहुल कोंडीबा बंडगर (विमुक्त व भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग)

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.