Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
इचलकरंजी – विजय मकोटे
दि.१५ : येथील अमॅच्युअर तायक्वोंदो अकॅडमीच्या दहा खेळाडूंची ‘ब्लॅक बेल्ट’ उच्च पदवी प्रमाणपत्र परीक्षा २०२६ साठी निवड झाली. त्यात ९ मूलींचा समावेश आहे.
सलग पाच वर्षे मार्शल आर्टचा सराव करणाऱ्या खेळाडूंमधून ‘ब्लॅक बेल्ट’ पदवी परीक्षेसाठी निवड केली जाते. यामध्ये खालील खेळाडूंचा समावेश आहे परीधी योगेश पारीक, भाविका विजय जोशी, श्रेया शरद कोष्टी, प्रांजली प्रदीप पाटील, गार्गी अमोल पाटील, दिशा विजय जोशी, सिद्धा कुलदीप गाडदी, गायत्री प्रकाश लोले, श्रद्धा दिलीप चव्हाण आणि विराज तुळशीदास येसाटे यांची निवड झाली आहे.
निवडप्राप्त खेळाडूंना ग्रॅण्डमास्टर रविकिरण चौगुले, सिनीअर ब्लॅक बेल्ट प्रशिक्षिका सौ. किरण चौगुले यांचे मार्गदर्शन तसेच रिया चौगुले, महेंद्र शिंदे, रोहित सुतार, विवेक अग्रवाल, सर्वेश हजारे, प्राजू बिरादार, नीरज तोष्णीवाल, मान्यता माधव, मंजुनाथ बिरादार, गौरी पाटील आदि ब्लॅक बेल्ट प्रशिक्षकांचे सहकार्य लाभले.
Mahalaxmi times is weekly Marathi news paper.mainly working in three Dist.kolhapur,sangli n ratnagiri.along with print media we have face book pages, Instagram,youtube channel,web
news portal . namely news17 .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.